मुंबई:मनसेची पोस्टरबाजी, काँग्रेसची घोषणाबाजी

02 Dec 2017 03:51 PM

काँग्रेस आणि मनसेतल्या वादाचा दुसरा अंकही आज मुंबईकरांना पाहायला मिळाला.
कारण तोडफोडीनंतर राज ठाकरेंचा पुतळा जाळणाऱ्या काँग्रेस कार्यकर्त्यांना मनसेनं पोस्टरमधून उत्तर दिलंय.
मध्यरात्री मनसेनं संजय निरुपम यांच्या घरासमोर एक आक्षेपार्ह पोस्टर लावलं होतं. ज्यात अतिशय खालच्या भाषेत निरुपम यांच्यावर टीका करण्यात आली होती. तसंच मुख्यमंत्र्यांनाही या पोस्टरमधून लक्ष्य करण्यात आलं होतं. तर मध्यरात्री काँग्रेसच्या खेरवाडीच्या कार्यालयावर शाईफेकही करण्यात आली.

LATEST VIDEOS

LiveTV