मुंबई : आरपीएफ कॉन्स्टेबलच्या प्रसंगावधानामुळे चालती ट्रेन पकडणाऱ्या प्रवाशाचा जीव वाचला

27 Nov 2017 05:54 PM

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवर चालती ट्रेन पकडताना एक व्यक्ती सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झालीय. ६२ वर्षांचे जगन्नाथ उन्हाळे यांचं तिकीट नागपूर दुरांतो एक्स्प्रेसचं होतं. मात्र चुकून त्यांनी आपलीच गाडी समजून सुटलेली विदर्भ एक्स्प्रेस पकडण्याचा प्रयत्न केला. तेवढ्यात ट्रेनने वेग घेतला आणि जगन्नाथ उन्हाळे ट्रेनसोबत फरफटत गेले. त्याच वेळी आरपीएफ कॉन्स्टेबल सचिन साबणे यांनी प्रसंगावधान राखत तात्काळ तिकडे धाव घेतली आणि अन्य प्रवाशांच्या साथीने या अपघातातून त्यांचा जीव वाचवला. मात्र आम्ही तुम्हाला या घटनेच्या निमित्ताने आवाहन करतोय की, सुटलेल्या ट्रेनमध्ये चढण्याचं धाडस कधीही करु नका.

LATEST VIDEOS

LiveTV