ओखी तडाखा : मुंबई : देशभरातून चैत्यभूमीवर आलेल्या भिमसैनिकांची मोठी गैरसोय

05 Dec 2017 11:36 AM

मुंबई, महाराष्ट्र आणि कोकणाला ओखी वादळाचा चांगलाच तडाखा बसल्याचं चित्र आहे. कारण काल संध्याकाळपासून मुंबई, पुणे, ठाणे, पालघरसह कोकणाला पावसानं झोडपून काढलं आहे. सतर्कतेच्या पार्श्वभूमीवर दादर चौपाटीकडे जाणारे सहाही रस्ते बंद करण्यात आले आहेत. तर दुपारी पावणेएक वाजण्याच्या सुमारास समुद्राला भरती येणार आहे. उद्यापर्यंत पाऊस आणि वाऱ्यांचा वेग कायम राहील अशी शक्यता हवामान खात्यानं वर्तवली आहे. त्यामुळे उद्याच्या महापरिनिर्वाणदिनावरही ओखीचं सावट राहणार आहे.

LATEST VIDEOS

LiveTV