मुंबई : अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमच्या संपत्तीचा लिलाव

13 Nov 2017 11:57 PM


भारताचा सर्वात मोठा शत्रू आणि मुंबईचा सर्वात मोठा गुन्हेगार अर्थात दाऊद इब्राहिमच्या संपत्तीचा उद्या लिलाव होणार आहे. दाऊदचं मुंबईतलं घर, हॉटेल आणि गेस्ट हाऊससाठी उद्या चर्चगेटमधल्या इंडियन मर्चंट चेंबरच्या कार्यालयात बोली लावली जाईल. उद्या सकाळी 10 ते दुपारी 12 पर्यंत हा लिलाव सुरू असेल. दाऊदची संपत्ती विकत घेण्यासाठी आतापर्यंत 12 जणांनी महसूल विभागाकडे माहिती मागवलीय. दरम्यान आतापर्यंत अनेकवेळा सरकारनं दाऊदची संपत्ती विकण्याचा प्रयत्न केला. पण प्रत्येक वेळी लिलावाची प्रक्रिया फसलीय. दरम्यान दाऊदच्या मालकीचं अफोरज हॉटेल विकत घेऊन त्या ठिकाणी शौचालय बांधण्याचा निर्धार हिंदू महासभेच्या चक्रपाणि यांनी केलाय.

LATEST VIDEOS

LiveTV