मुंबई : मुंबई विद्यापीठातून कोकण विद्यापीठ वेगळं करण्याची मागणी

28 Nov 2017 09:57 PM

मुंबई विद्यापीठातून कोकण विद्यापीठ वेगळं करण्याची मागणी कोकण विद्यापीठ कृती समितीने केलीय. मुंबई विद्यापीठाच्या ऑनलाईन पेपर तपासणीच्या गोंधळानंतर विद्यापीठाची पुरती बेअब्रू झाली. त्याचा नाहक त्रास कोकणातील विद्यार्थ्यांना सहन करावा लागला. रत्नागिरी, सिंधूदुर्ग, रायगड जिल्ह्यातील एकूण 103 महाविद्यालयांसाठी स्वतंत्र कोकण विद्यापीठ स्थापन करण्याची मागणी कोकणातील प्राचार्य आणि प्राध्यापकांनी केलीय.

LATEST VIDEOS

LiveTV