मुंबई : महादेव जानकर यांची आमदारकी रद्द करा, निवडणूक आयोगाकडे तक्रार

02 Dec 2017 11:36 PM

राज्याचे दुग्ध विकास मंत्री महादेव जानकर यांची आमदारकी रद्द करा अशी तक्रार निवडणुक आयोगाकडे करण्यात आलीय. रासपचे पदाधिकारी आणि धनगर समाज संघर्ष समितीचे अध्यक्ष हेमंत पाटील यांनी ही तक्रार केलीय. रासपचे अध्यक्ष असताना भाजपच्या चिन्हावर जानकर विधान परिषद निवडणूक जिंकले. यानंतर त्यांनी भाजपच्या कोट्यातील मंत्रीपद स्विकारलं. हा पक्षविरोधी कायद्याचा भंग असून या कायद्यांतर्गत जानकरांवर कारवाई करण्याची मागणी पाटील यांनी केलीय. 

LiveTV