मुंबई : डीएसकेंना हायकोर्टाचा 23 नोव्हेंबरपर्यंत तात्पुरता दिलासा

17 Nov 2017 09:06 PM

पुण्यातील प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक डी. एस. कुलकर्णी यांना मुंबई उच्च न्यायालयानं 23 नोव्हेंबरपर्यंत तात्पुरता दिलासा दिला आहे. गेल्या सुनावणीच्या वेळेस न्यायालयानं डीएसकेंना आठवड्याभराची मुदत देत ठेवीदारांचे पैसे कसे परत करणार याची विचारणा केली होती. त्यानुसार 2 महिन्यांत 150 कोटी परत करण्याची तयारी डीएसकेंकडून कबुली देण्यात आली.

मात्र यास स्पष्ट नकार देत न्यायमूर्ती अजय गडकरी यांनी पुढिल सुनावणीच्या वेळेस जामीनासाठी युक्तिवाद सुरू करण्याचे निर्देश याचिकाकर्त्यांना दिले आहेत. दोन महिने हा फार मोठा कालवधी असून कबूल केल्यानंतरही लोकांना त्यांचे पैसे वेळेत मिळत नाहीत असा अनुभव असल्याचं यावेळी न्यायमूर्ती अजय गडकरी यांनी बोलून दाखवलं.

LATEST VIDEOS

LiveTV