मुंबई : माजी मंत्री एकनाथ खडसेंकडे रामटेकचं 15 लाखांचं भाडं थकित

11 Dec 2017 11:27 AM

भाजपचे नेते माजी महसूलमंत्री एकनाथ खडसे यांच्याकडे रामटेक बंगल्याचं 15 लाख रुपयांचं भाडं अद्याप थकित असल्याचं एका माहिती अधिकारात समोर आलं. आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांनी ही माहिती दिली. थकित भाड्याबाबत खडसे यांना स्मरणपत्र पाठवल्याची माहितीही सार्वजनिक बांधकाम विभागाने दिली. खडसे यांनी 4 जून 2016 ला मंत्रीपदाचा राजीनामा दिला होता. त्यानंतर त्यांना बंगला सोडण्यासाठी तीन महिन्यांनी मुदतवाढ देण्यात आली. बांधकाम विभागानं रामटेक बंगला 19 नोव्हेंबर 2016 ला ताब्यात घेतला. खडसे यांच्याकडे 19 नोव्हेंबर 2016 पर्यंत 15 लाख 49 हजार 975 रुपये भाडं थकित आहे. थकित भाड्याचा भरणा करण्यासाठी खडसेंना स्मरणपत्रही पाठवण्यात आलं आहे.

LATEST VIDEOS

LiveTV