मुंबई: 31 डिसेंबरला मध्य आणि हार्बर मार्गावर विशेष लोकल सेवा

28 Dec 2017 10:39 AM

मध्यरेल्वे आणि हार्बर रेल्वे मार्गावरील प्रवाशांसाठी ३१ डिसेंबरच्या रात्री विषेश गाड्या सोडण्यात येतील, अशी माहिती रेल्वेकडून देण्यात आलीय. सीएसएमटी ते कल्याण आणि सीएसएमटी ते पनवेल मार्गावर विशेष गाडी सोडण्यात येणार आहे. या गाड्या रात्री दीड वाजता सोडल्या जातील. त्यामुळे नववर्षाच्या स्वागताला सज्ज झालेल्या मुंबईतील तरुणाईसाठी ही आनंदाची बातमी आहे.

LATEST VIDEOS

LiveTV