मुंबई : यावर्षी 6 कबुतर आणि एका कुत्र्याला फटाक्यांमुळे इजा

22 Oct 2017 07:45 PM

दिवाळीमध्ये मोठ्या उत्साहात आपण फटाक्यांची आतषबाजी करतो. मात्र याचा फटका माणसांबरोबरच मुक्या प्राण्यांनाही मोठ्या प्रमाणात बसल्याचं पहायला मिळतंय. मुंबईत यावर्षी 6 कबुतर आणि एका कुत्र्याला फटाक्यांमुळं इजा झालीय. फटाक्यांच्या आवाजामुळं प्राणि आणि पक्षांच्या कर्णपटलाला इजा पोहचते तसंच हवाप्रदूषणामुळं त्यांना अस्थमासारखे आजारही जडतात. सुप्रीम कोर्टाच्या आदेशानंतरही लोकांनी मोठ्या प्रमाणात फटाक्यांची आतषबाजी केली होती. त्यामुळं आपली दिवाळी ही मुक्या प्राण्यांच्या जीवावर उठू नये याची काळजी  प्रत्येकानं घेणं गरजेचं आहे.

LATEST VIDEOS

LiveTV