मुंबई : एसी लोकलला फर्स्ट क्लासचा पास चालणार?

11 Dec 2017 11:51 AM

मुंबईत रोज फर्स्ट क्लासने प्रवास करणाऱ्या कर्मचाऱ्यांना एसी लोकलसाठी वेगळं तिकीट काढण्याची गरज असणार नाही. कारण, फर्स्ट क्लासचा पास एसी लोकलला चालणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. नवीन वर्षात एसी लोकल पश्चिम रेल्वेमार्गावर धावणार आहे. खरंतर पश्चिम रेल्वेवर चर्चगेट ते डहाणू या मार्गावर फर्स्ट क्लासने प्रवास करणारे जवळपास 36 लाख प्रवासी आहेत. फर्स्ट क्लासचं भाडं एसी लोकलच्या प्रस्तावित भाड्यापेक्षा जास्त आहे. त्यामुळे अशा प्रवाशांना एसी लोकलसाठी वेगळं तिकिट काढण्याची गरज नसल्याचं पश्चिम रेल्वेच्या सुत्रांनी सांगितलं.

LATEST VIDEOS

LiveTV