मुंबई: गरीबनगरातील अतिक्रमण हटवलं, 80 टक्के परिसर मोकळा

04 Nov 2017 08:54 AM

मुंबईच्या वांद्र्यातील गरीबनगर भागातील अनधिकृत झोप़डपट्ट्यांवरील तोडक कारवाईमुळे 80 टक्के परिसर मोकळा झालाय.... गेल्याच आठवड्यात पालिकेनं अनधिकृत झोपड्यांवर कारवाई केली..मात्र कारवाईदरम्यान परिसरात आग लावण्यात आली.. दरम्यान सोमवारी पालिकेनं पुन्हा एकदा कारवाईचा बडगा उगारला... मात्र गुरूवारी पालिकेनं तुर्तास कारवाई थांबवावी असे आदेश हायकोर्टानं दिले... त्यामुळे सध्या तरी झोपडपट्ट्यांवरील कारवाई थांबवण्यात आलीए..मात्र झोपडपट्ट्या हटवल्यामुळे गरीबनगर परिसरानं मोकळा श्वास घेतलाय...

LATEST VIDEOS

LiveTV