मुंबई : गोरेगावहून थेट पनवेल लोकल सेवा लवकरच सुरु होणार

10 Dec 2017 11:18 AM

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते अंधेरीपर्यंतच्या हार्बर मार्गाचा लवकरच गोरेगावपर्यंत विस्तार होणार आहे. त्यामुळं सध्या अंधेरी ते पनवेल अशा चालणाऱ्या फेऱ्या गोरेगावहून सुरू करण्याचा रेल्वे प्रशासनाचा मानस आहे. पश्चिम उपनगरातील प्रवाशांना आता थेट पनवेलला जाणं सुसह्य होणार आहे. सध्या सीएसएमटी ते अंधेरी मार्गावर 91 फेऱ्या चालविल्या जात आहेत. हार्बर मार्गावर यापूर्वी अंधेरीपुढे कोणतीही मार्गिका उपलब्ध नव्हती.

LATEST VIDEOS

LiveTV