मुंबई : ऋतुरंग दिवाळी अंकाचं गुलजार यांच्या हस्ते प्रकाशन

14 Oct 2017 01:21 PM

गुलजार ..
तुम्ही जिथं आहात तिथं तुम्हाला थबकायला लावण्यासाठी हा एक शब्द पुरेसा आहे. गीतं, कविता आणि  पुस्तकांचा खजिना गुलजार या एका नावात आहे. गुलजार म्हणजे कानांसाठी आणि मेंदूसाठी एक पर्वणी आहे. पण ती नेहमी मिळत नाही. तो योग जुळून आला परवा म्हणजे 12 तारखेला. अरुण शेवते यांच्या ऋतुरंग दिवाळी अंकाच्या प्रकाशनाच्या निमित्तानं. यावेळी गुलजार यांच्यासमवेत व्यासपीठावर माजी केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे आणि यशवंतराव गडाखही उपस्थित होते. गुलजार यांनी यावेळी आपल्या आयुष्यातील टर्निंग पॉईंट्स उलगडून दाखवले..

LATEST VIDEOS

LiveTV