मुंबई : 'ओखी' वादळामुळे शाळांना सुट्टी, राज्यभरात पाऊस

05 Dec 2017 09:09 AM

मुंबईसह राज्यभरात ओखी वादळाचा परिणाम जाणवू लागला आहे. मुंबई, ठाणे, पालघरसह राज्यातील ठिकठिकाणी पावसाने हजेरी लावली आहे. कोकणातील रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग तसंच गोवा, औरंगाबादमध्ये पाऊस कोसळत आहे. ओखी चक्रीवादळाच्या तडाख्याच्या पार्श्वभूमीवर खबरदारी म्हणून आज (मंगळवार 5 डिसेंबर) मुंबईसह परिसरातील शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी ट्विटरवरुन यासंदर्भात माहिती दिली आहे.

LATEST VIDEOS

LiveTV