मुंबई : एल्फिन्स्टन दुर्घटनेतील मृतांच्या कपाळावर नंबर टाकणं चुकीचं : हायकोर्ट

15 Dec 2017 08:54 AM

मुंबईतील एल्फिन्स्टन स्टेशनवर झालेल्या चेंगराचेंगरीत मृत्युमुखी पडलेल्या नागरिकांच्या कपाळावर नंबर टाकल्याप्रकरणी मुंबई हायकोर्टाने राज्य सरकारला झापलं आहे. एल्फिन्स्टन स्टेशनवरील ब्रिजवर झालेल्या चेंगराचेंगरीत मृत्युमुखी पडलेल्या नागरिकांच्या कपाळावर नंबर टाकणं चुकीचं असल्याचं मत हायकोर्टाने व्यक्त केलं. मृतदेहांचाही सन्मान करायला हवा, अशा शब्दात हायकोर्टाने राज्य सरकारला सुनावलं. डॉक्टरांनी शवविच्छेदन करताना कपाळावर स्केचपेननं नंबर टाकल्याची माहिती यावेळी राज्य सरकारने दिली.

LATEST VIDEOS

LiveTV