मुंबई : 'मॅट'कडे दाद मागा, लिंगबदल सुट्टीसाठीच्या याचिकेवर हायकोर्टाचे निर्देश

27 Nov 2017 03:12 PM

लिंगबदल शस्त्रक्रियेसाठी मुंबई उच्च न्यायालयात दाद मागणाऱ्या महिला पोलीस कॉन्स्टेबलला महाराष्ट्र प्रशासकीय लवादाकडे दाद मागण्याचे निर्देश हायकोर्टाने दिले.

हे प्रकरण प्रशासकीय सेवेशी निगडीत असल्यानं याचिकाकर्त्यांनी थेट हायकोर्टात न येता आधी ‘मॅट’मध्ये दाद मागणं अपेक्षित असल्याचं हायकोर्टानं स्पष्ट केलं. न्यायमूर्ती सत्यरंजन धर्माधिकारी आणि न्यायमूर्ती भारती डांगरे यांच्या खंडपीठापुढे सुनावणी झाली.

बीड पोलीस अधीक्षक कार्यालयात काम करणाऱ्या ललिता साळवेंनी लिंगबदल शस्त्रक्रियेकरता सुट्टी द्यावी, असा अर्ज केला.

बीड पोलीस अधिक्षक कार्यालयासह महाराष्ट्र पोलीसदलच नाही तर राज्याचे गृह विभागदेखील यासंदर्भात पुढे काय करायचं याचा विचार करत आहेत. कारण ललिताने मागणी लावून धरलीय की, ऑपरेशननंतरही पोलीस दलातील आपली नोकरी कायम रहावी.

LATEST VIDEOS

LiveTV