मुंबई : मेट्रोच्या भाडेवाढीला नकार, हायकोर्टाचा दिलासा

04 Dec 2017 08:36 PM

हायकोर्टाने मेट्रोने प्रवास करणाऱ्या मुंबईकरांना दिलासा दिला आहे. मेट्रोच्या दरवाढीला हायकोर्टाने नकार दिला आहे. यासाठी राज्य सरकारने एका समितीची नियुक्ती करावी आणि पुढील तीन महिन्यात अहवाल द्यावा, अशी सूचना हायकोर्टाने केली आहे. मुंबई मेट्रोचं प्रवास भाडं 10 ते 40 रुपयांदरम्यान आहे. मात्र हे भाडं 5 रुपयांनी वाढवण्याचा निर्णय 2015 मध्ये झाला होता. या निर्णयाला मुंबई हायकोर्टाने स्थगिती देत सुनावणी पुढे ढकलली होती. त्यामुळे पुन्हा एकदा दरवाढ टळली आहे.

LATEST VIDEOS

LiveTV