मुंबई : राज्यतील रस्त्यांवरचे खड्डे बुजवण्याची 15 डिसेंबर डेडलाईन, मंत्रालयात वॉर रुम

07 Nov 2017 09:36 PM

राज्यातील खड्डे बुजवण्याच्या मोहिमेसाठी सार्वजनिक बांधकाम विभागाने 15 डिसेंबरची डेडलाईन निश्चित केली आहे. तब्बल 97 हजार किलोमीटर मार्गावरील खड्डे बुजवण्यासाठी विभागाने मंत्रालयातच वॉर रुमची स्थापना केली आहे.

दररोज किती किमी मार्गावरचे खड्डे बुजवले गेले, याचा आढावा घेतला जात आहे. खड्डे बुजवण्यासाठी वॉर रुमच्या माध्यमातून जिल्हानिहाय कामांवर लक्ष ठेवले जात आहे.

सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या ट्विटर हँडलवरुन #PatholeMuktMaha हॅशटॅग वापरुन खड्डे बुजवलेल्या रस्त्यांचे फोटोही शेअर केले जात आहेत.

LATEST VIDEOS

LiveTV