मुंबई : जुहूमध्ये पिंकेथॉनचं आयोजन; नऊवारी साडी नेसून, नथ घालून महिलांचा सहभाग

18 Nov 2017 11:00 AM

ठाण्यानंतर आज मुंबईच्या जुहू चौपाटीवर पिंकेथॉनचं आयोजन करण्यात आलं होतं. महिलांसाठी आयोजन कऱण्यात आलेल्या या 2 किलोमीटरच्या मिनी मॅरेथॉनमध्ये अनेक महिलांनी उत्साहानं सहभाग घेतला. पिंकेथॉनला यावेळी काही महिलांनी नऊवारी साडी नेसून आणि नाकात नथ घालून पारंपारिक वेषात तर काही महिलांनी पाचवारी साडी नेसून मॅरेथॉनमध्ये सहभाग नोंदवला. यावेळी महिलांना प्रोत्साहित करण्यासाठी अभिनेता मिलिंद सोमणनं टी-शर्ट आणि धोतर घालून हजेरी लावली होती.

LATEST VIDEOS

LiveTV