कमला मिल्स कंपाऊंड आग : 'वन अबव्ह' मालकाच्या कुटुंबियांविरोधात गुन्हे दाखल होणार

31 Dec 2017 12:12 PM

तीन दिवसानंतरही कमला मिल अग्नितांडवातील सर्व आरोपी अजूनही मोकाटच आहेत. आरोपी परदेशात पळून जाऊ नयेत, म्हणून लूक आऊट नोटीस बजावण्यात आली. अभिजित मानकर, हृतेश संघवी आणि जिगर सिंघवी हे तिघे वन अबव्ह पबचे मालक आहेत. तिघांविरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला. पाच शोध पथकांकडून आरोपींचा शोध सुरु आहे. हे सर्व सी ग्रेड हॉस्पिटिली एलएलपी कंपनीचे मालक आहेत. तर दुसरा गुन्हा मोजोज बिस्ट्रो पबच्या मालकावर नोंदवण्यात आला. 

LATEST VIDEOS

LiveTV