मुंबई : पालिकेला अखेर जाग, कमला आणि रघुवंशी मिलमधील अनधिकृत बांधकामांवर हातोडा

30 Dec 2017 09:54 PM

2018 च्या नव्या वर्षात जास्तीत जास्त अनधिकृत बांधकामं जमीनदोस्त करण्याचा चंग मुंबई महापालिकेनं बांधलाय..कमला मिलच्या अग्नितांडवात 14 निष्पापांचा बळी गेल्यावर महापालिकेनं जाग लागलीये... लोअर परळची कमला मील आणि वरळीची रघुवंशी मिलमधील अनधिकृत बांधकामांवर हातोडा पडतोय...यामध्ये अनेक हॉटेल्स आणि पब्सना जमीनदोस्त केलं जातंय..आज दिवसभरात तब्बल 60 अनधिकृत हॉटेल्सवर कारवाई झालीये....मात्र महापालिकेनं आधीच खबरदारी घेतली असती तर ही वेळ आलीच नसती...दरम्यान कालच्या दुर्घटनेनंतर  मुंबई महापालिकेच्या 5 अधिकाऱ्यांचं निलंबनही करण्यात आलं... तर जी साऊथ वॉर्डचे सहाय्यक आयुक्त  सपकाळ याची तडकाफडकी बदली करण्यात आली... 

LATEST VIDEOS

LiveTV