मुंबई : कुर्ल्यात दोन रिक्षांच्या अपघातात पत्रकाराचा मृत्यू

15 Dec 2017 11:33 PM

मुंबईच्या कुर्ल्यामध्ये दोन रिक्षांच्या अपघातात एका पत्रकाराचा मृत्यू झालाय. प्रशांत त्रिपाठी असं या पत्रकाराचं नाव असून त्यांनी विविध न्यूज चॅनलमध्ये काम केलंय. आपल्या आजोबांच्याअंत्यविधीसाठी उत्तर प्रदेशात गेलेले प्रशांत त्रिपाठी मुंबईत परतले होते. प्रशांत त्रिपाठी हे रिक्षातून घरी परतत होते. त्याचवेळी समोरुन भरधाव वेगाने एक रिक्षा येत होती मात्र या रिक्षाचालकाला गतीरोधक दिसला नाही. त्यामुळं समोरची रिक्षा गतीरोधकावरुन उडाली आणि थेट प्रशांत त्रिपाठी यांच्या रिक्षावर जावून आदळली. यात गंभीर जखमी झालेल्या प्रशांत त्रिपाठी यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.

LATEST VIDEOS

LiveTV