मुंबई : लिंगबदलानंतर नोकरीवर गदा, ललिता साळवेची हायकोर्टात धाव

23 Nov 2017 06:21 PM

लिंगबदलाच्या मागणीनंतर नोकरीवर गदा आल्यामुळे बीडची महिला कॉन्स्टेबल ललिता साळवेनं मुंबई उच्च न्यायालयाचं दार ठोठावलं आहे. लिंगबदलाच्या शस्त्रक्रियेनंतरही  आपल्याला पोलीस दलानं नोकरीत कायम ठेवावं, अशी मागणी ललिता साळवेनं केलीय. दरम्यान, आता या प्रकरणात मुख्यमंत्र्यांनीही हस्तक्षेप केला असून  पोलीस महासंचालक तसंच गृहविभागानं याप्रकरणाकडे सहानुभूतीनं पाहावं, असा सल्ला मुख्यमंत्र्यांकडून देण्यात आला आहे.  बीडची महिला कॉन्स्टेबल ललिता साळवेनं काही दिवसांपूर्वी लिंगबदलाची मागणी केल्यामुळे एकच चर्चा रंगली होती.   मात्र शस्त्रक्रियेनंतर स्त्री-पुरुषाच्या निकषात कार्यालयीन अडचणी येत असल्यानं पुन्हा नोकरीवर रुजू होण्यास पोलीस दलानं मनाई केलीय.  काल जेजे रुग्णालयात ललित साळवेनं पूर्वतपासणी केली. त्यानंतर डॉक्टरांनी लिंगबदलाचा निर्णय योग्य असल्याचं स्पष्ट केलंय.

LATEST VIDEOS

LiveTV