मुंबई : युतीच्या आमदारांचे 'लाड', पंचतारांकित 'ताज'मध्ये 'प्रसाद'

06 Dec 2017 05:48 PM

एकीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी भाजपच्या नेत्यांना साधेपणाची शिकवण देत असतात, तरी दुसरीकडे भाजप नेते अलिशान पंचतारांकित हॉटेलमध्ये स्नेहभोजन करणार आहेत. विधान परिषद पोटनिवडणुकीसाठी भाजपचे उमेदवार असलेले प्रसाद लाड यांनी युतीच्या आमदारांसाठी आज संध्याकाळी मुंबईतील पंचतारांकित ‘ताज’ हॉटेलमध्ये स्नेहभोजन आयोजित केले आहे.

नारायण राणे यांनी यांनी राजीनामा दिल्यानंतर रिक्त झालेल्या विधान परिषदेच्या जागेवर उद्या पोटनिवडणूक आहे. त्याआधी या पोटनिवडणुकीत भाजपचे अधिकृत उमेदवार असलेल्या प्रसाद लाड यांनी युतीच्या आमदारांसाठी ‘ताज’ हॉटेलमध्ये स्नेहभाजन आयोजित केले आहे.

LATEST VIDEOS

LiveTV