मुंबई : गुजरातमध्ये 99, राज्यात अर्धशतकही करता येणार नाही : मराठा युवा क्रांती

20 Dec 2017 06:30 PM

मुंबई : गुजरात विधानसभा निवडणुकांच्या निकालानंतर महाराष्ट्रात भाजपला इशारा देणारे पोस्टर्स झळकायला लागले आहेत. मराठा युवा क्रांती मोर्चातर्फे ठिकठिकाणी हे पोस्टर्स लावण्यात आले आहेत.

'हुकलेले शतक हा इशारा समजा, महाराष्ट्रात मराठ्यांच्या आरक्षणाकडे दुर्लक्ष कराल, तर पुढच्या निवडणुकीत अर्धशतकी टप्पाही पार करणं अवघड होईल. तोच मराठ्यांचा करारा जबाब समजा' असा मजकूर या पोस्टरवर लिहिण्यात आला आहे.

LATEST VIDEOS

LiveTV