खेळ माझा : एमसीएच्या ट्वेन्टी 20 मुंबई लीगचं लॉन्चिंग

07 Dec 2017 11:36 PM

मुंबई क्रिकेट असोसिएशन म्हणजे एमसीएच्या पहिल्यावहिल्या ट्वेन्टी ट्वेन्टी मुंबई लीगची घोषणा करण्यात आली. बीकेसीतल्या एमसीए अॅकॅडमीत आयोजित कार्यक्रमात ट्वेन्टी ट्वेन्टी मुंबई लीगच्या लोगोचं अनावरण करण्यात आलं. एमसीएचे अध्यक्ष आशीष शेलार, माजी कसोटीवीर विनोद कांबळी आणि अभिनेता सैफ अली खान यांच्या प्रमुख उपस्थितीत या सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं. येत्या ४ ते ९ जानेवारी या कालावधीत या स्पर्धेचे सामने वानखेडे स्टेडियमवर खेळवण्यात येतील. मुंबईतील सहा संघ या स्पर्धेत सहभागी होणार असून, या संघांत स्थानिक खेळाडूंसोबत आजी-माजी रणजीपटू आणि आयपीएलवीरांचा समावेश असेल. एमसीएचे अध्यक्ष आशीष शेलार आणि माजी कसोटीवीर विनोद कांबळी यांनी ट्वेन्टी ट्वेन्टी मुंबई लीगबद्दल काय प्रतिक्रिया दिली आहे, पाहूयात.

LATEST VIDEOS

LiveTV