मुंबई : फेरीवाल्यांच्या मारहाणीनंतर मनसे कायकर्ते आक्रमक, निरुपमांनी फेरीवाल्यांना चिथावल्याचा आरोप

29 Oct 2017 11:33 AM

मालाडमध्ये मनसे आणि फेरीवाल्यामध्ये झालेल्या मारहाणीचं लोण आता दादरपर्यंत पसरलं आहे. कारण मालाडमध्ये मनसे पदाधिकाऱ्याला फेरीवाल्यांनी मारहाण केल्यानंतर दादरमध्ये मनसे कार्यकर्त्यांनी फेरीवाल्यांना लक्ष्य केलं आहे. मनसेच्या कार्यकर्त्यांनी दादर स्थानकाजवळील फेरीवाल्यांच्या स्टॉलची तोडफोड केली आहे.

मनसेनं फेरीवाल्यांविरोधात सुरु केलेल्या आंदोलनामध्ये काँग्रेस नेते संजय निरुपमांनी उडी घेतल्यानंतर आता हे प्रकरण चांगलच चिघळलं आहे. संजय निरुपमा यांनी चिथावणी दिल्याचा आरोप मनसेनं केला आहे.

मुंबईच्या मालाडमध्ये फेरीवाल्यांनी मनसे कार्यकर्त्यांवर हल्ला केला आणि यात मनसे विभाग अध्यक्ष सुशांत माळवदे गंभीर जखमी झाले. त्यांना खासगी रुग्णालयात भरती करण्यात आलं आहे. दरम्यान या घटनेआधी मालाडमध्ये झालेल्या सभेत संजय निरूपम फेरीवाल्यांना कायदा हातात घेण्यासाठी उसकावलं. त्यानंतर ही घटना घडली आहे.

LATEST VIDEOS

LiveTV