मुंबई: मनसेच्या संदीप देशपांडेंसह ८ जणांचा जामीन अर्ज फेटाळला

07 Dec 2017 10:27 AM

मुंबई प्रदेश काँग्रेस कार्यालय तोडफोड प्रकरणी मनसे नेते संदीप देशपांडेंसह ८ जणांचा जामीन अर्ज मुंबईतील दंडाधिकारी न्यायालयाने फेटाळून लावलाय. यांना जामीन दिल्यास पुन्हा कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो अशी भुमिका घेत पोलिसांनी या जामिनास विरोध केल्यानं कोर्टानं हा जामीन अर्ज फेटाळून लावलाय. त्याचबरोबर गुन्हा नोंदवताना पोलिसांनी लवलेली कलमही तगडी असल्यानं मनसैनिकांची तातडीनं सुटका करण्यास कोर्टाने नकार दिलाय.

LATEST VIDEOS

LiveTV