मुंबई : मागितले तर सात दिले असते, चोरुन फक्त छक्के नेले, मनसेची सेनेविरोधात पोस्टरबाजी

15 Oct 2017 11:21 AM

मनसेने दादर परिसरात पोस्टरबाजी करत शिवसेनेवर टीकास्त्र सोडलं आहे. ‘मागितले असते तर सात दिले असते, चोरुन फक्त छक्के घेऊन गेले’, असा मथळा छापलेले पोस्टर्स दादर भागात लावण्यात आले आहेत.

मुंबई महापालिकेतील मनसेचे 6 नगरसेवक फोडून, शिवसेनेने मास्टरस्ट्रोक मारला आहे. मनसेच्या सातपैकी सहा नगरसेवकांना फोडण्यात शिवसेनेला यश मिळालं. त्यानंतर मनसेने आता शिवसेनेवर पोस्टर्सच्या माध्यमातून निशाणा साधला आहे.

LATEST VIDEOS

LiveTV