मुंबई: ‘यशराज’ची मुजोरी खपवून घेणार नाही, ‘देवा’साठी मनसे आक्रमक

20 Dec 2017 04:03 PM

 यशराज फिल्म्सच्या सिनेमांची शूटिंग महाराष्ट्रातही होते, हे त्यांनी लक्षात ठेवावं. मुजोरी खपवून घेणार नाही, असा सज्जड दम महाराष्ट्र नवनिर्माण चित्रपट सेनेचे अध्यक्ष अमेय खोपकर यांनी दिला आहे. ‘टायगर जिंदा है’ सिनेमामुळे ‘देवा’ सिनेमाला महाराष्ट्रात स्क्रीन मिळत नसल्याने मनसे आता आक्रमक झाली आहे.

यशराज फिल्म्सची दादागिरी चालू देणार नाही. मुजोरीला उत्तर देणार. चर्चेतून प्रश्न सुटला तर ठीक, नाहीतर महाराष्ट्रात यशराजची शूटिंग होऊ देणार नाही, असा इशारा अमेय खोपकर यांनी दिला.

LATEST VIDEOS

LiveTV