मुंबई : वारिस पठाण लॉटरीवर निवडणूक जिंकलेले आमदार, पठाणांच्या आव्हानाला मनसेचं प्रत्युत्तर

04 Dec 2017 10:45 AM

अनधिकृत फेरीवाल्यांच्या मनसे-काँग्रेस वादात आता एमआयएमनं उडी घेतली आहे. हिंमत असेल तर भायखळ्यात येऊन तोडफोड करुन दाखवा, असं आव्हान एमआयएमचे आमदार वारिस पठाण यांनी राज ठाकरेंना दिलं. शिवाय राज ठाकरे म्हणजे बुझा हुआ दिया अशी टीका पठाण यांनी केली. ईद-ए-मिलाद निमित्त सोलापुरात आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. दरम्यान महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून वारिस पठाण यांच्या वक्तव्याचा चांगलाच समाचार घेतला गेला आहे.

LiveTV