मुंबई : विक्रोळीत मनसे उपविभागप्रमुखाला मारहाण प्रकरणी काँग्रेस कार्यकर्त्यांसह चारजण अटकेत

27 Nov 2017 06:00 PM

विक्रोळीतील मनसे उपविभागप्रमुखाला मारहाण प्रकरणी टागोरनगरमधील काँग्रेसचे अब्दुल अन्सारी आणि रिझवान नावाच्या व्यक्तीला अटक केली गेली. तसंच मनसेचे जयंत दांडेकर आणि किसन गायकर यांच्यावर अटकेची कारवाई झाली.
काल विक्रोळीत संध्याकाळच्या सुमारास हा प्रकार घडला. दुकानदारांनी मराठी पाट्या लावाव्यात, यासाठी मनसे पदाधिकाऱ्यांकडून दुकान मालकांना निवेदन दिलं जातं होतं. त्याचवेळी 15 ते 20 जणांनी मनसे कार्यकर्त्यांवर हल्ला केला. सध्या त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

LATEST VIDEOS

LiveTV