मुंबई : उद्धव ठाकरेंविरोधात कृष्णकुंजबाहेर मनसैनिकांची घोषणाबाजी

15 Oct 2017 12:27 PM

मनसेचे सहा नगरसेवक शिवसेनेनं गळाला लावल्यानंतर मनसे कार्यकर्ते आक्रमक झाले. राज ठाकरे यांच्या कृष्णकुंज निवासस्थानाबाहेर संतप्त कार्यकर्त्यांनी उद्धव ठाकरे यांच्याविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. फोडाफोडीमुळे संतप्त झालेल्या मनसे कार्यकर्त्यांचा रोष पाहता कुठलीही अघटित घटना घडू नये, म्हणून दिलीप लांडे, दत्ताराम नरवणकर, परमेश्वर कदम, डॉ.अर्चना भालेराव, अश्विनी माटेकर आणि हर्षला मोरे यांच्या घरांना पोलीस संरक्षण देण्यात आलं.

LATEST VIDEOS

LiveTV