मुंबई : एलफिन्स्टन दौऱ्यातून शिवसेना खासदार अरविंद सावंतांना वगळलं : शिवसेनेचा आरोप

31 Oct 2017 12:18 PM

मुंबईतील एलफिन्स्टन स्थानकावरील फूट ओव्हर ब्रीज बांधण्याची जबाबदारी भारतीय सैन्याकडे दिली जाणार आहे. आज मुख्यमंत्री फडणवीस आणि रेल्वेमंत्री पियुष गोयल एल्फिन्स्टन स्थानकाची पाहणी करायला येणार आहेत. मात्र या दौऱ्यात शिवसेनेचे खासदार अरविंद सवंत यांना वगळण्यात आल्याचा आरोप शिवसेनेनं केला. त्यामुळे खासदार सावंत नाराज झाले आहेत.
एलफिन्स्टन स्टेशनवर चेंगराचेंगरीत 23 जणांचा मृत्यू झाला होता.
कमीत कमी वेळेत किंवा तातडीनं काम पूर्ण करायचं असल्यास अशा प्रकारच्या बांधकामांची जबाबदारी सैन्याकडे दिली जाते. याआधी कॉमनवेल्थ स्पर्धेवेळी दिल्लीत पूल कोसळल्यानंतर सैन्यानं तो पूल लवकरात लवकर बांधून दिला होता.

LATEST VIDEOS

LiveTV