मुलुंड : कोटक महिंद्रा बँकेच्या ATM चा घोळ, अकाऊंटमधून लाखो रुपये गायब

20 Dec 2017 08:54 AM

गुजरात निवडणुकीच्या निमित्ताने देशभरात ईव्हीएम घोटाळ्याची चर्चा असताना, मुंबईतील मुलुंडमध्ये एटीएम घोटाळा समोर आला आहे.

मुलुंड पूर्वेच्या कोटक महिंद्रा बँकेच्या एटीएममधून पैसे काढलेल्या जवळपास 50 ते 60 जणांना लाखो रुपयांचा फटका बसला आहे.

एटीएममधून पैसे काढून गेल्यानंतर, एसएमएस आला. पण त्यानंतरही चार-पाच तासांनी पुन्हा अकाऊंटमधून पैसे गेल्याचं समोर आलं. हा प्रकार एक-दोघांबाबत घडला नाही, तर तब्बल 50 ते 60 जणांना याचा फटका बसला आहे.

LATEST VIDEOS

LiveTV