मुंबई : सलगच्या सुट्टीमुळे मुंबईबाहेर जाणाऱ्या सर्व मार्गांवर मोठी वाहतूक कोंडी

24 Dec 2017 03:57 PM

नाताळच्या सलग सुट्ट्यांमुळे आजही अनेक महामार्गांवर हळूहळू वाहतूक कोंडी होऊ लागली आहे. मुंबई-गोवा महामार्गावर पेण जवळ वाहनांची कोंडी झाली आहे.  याठिकाणी 3 ते 4 किलोमीटपर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या आहेत.  तर दुसरीकडे मुंबई-पुणे महामार्गावरच्या खंडाळा घाटात वाहतूक कोंडी होऊ नये., यासाठी लोणावळ्याजवळ दर 1 तासांनी वाहनं अडवली जाणार आहे. त्यानंतर ती पुढे टप्प्याटप्प्यानं सोडण्याचा निर्णय घेतला गेलाय. याबरोबर मुंबई-अहमदाबाद महामार्गावरही ट्रॅफिक झालंय. 

LATEST VIDEOS

LiveTV