मुंबई : शिवसेनेच्या विरोधानंतरही निवडणूक जिंकलो असतो, नारायण राणेंचा दावा

27 Nov 2017 06:36 PM

शिवसेनेच्या तीव्र विरोधानंतर भाजपनं राणेंचा पत्ता कट केला आणि प्रसाद लाड यांना विधान परिषदेसाठी संधी दिली. दरम्यान माझ्याविरोधात शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीनं एकत्र येणं हाच विजय असल्याचं नारायण राणे म्हणाले. भाजपकडून मला संधी मिळाली असती तर शिवसेनेची मतं फुटली असती. तसंच शिवसेनेच्या विरोधानंतरही विधान परिषदेची पोटनिवडणूक मी जिंकलो असतो असा विश्वास राणेंनी बोलून दाखवला आहे. 

LATEST VIDEOS

LiveTV