मुंबई : 2009 सालच्या कामगार भरतीतील पात्र उमेदवारांचा घेराव

15 Nov 2017 10:39 PM


आज मुंबई महापालिकेत 2009 कामगार भरतीतील पात्र उमेदवारांना सेवेत सामवून घेण्यासाठी उमेदवारांनी महापालिकेबाहेर घेराव घातला. 2009 साली महापालिकेत कामगार भरतीसाठी परीक्षा घेऊन जवळपास 13 हजार कामगारांना नोकरीसाठी पात्र ठरविण्यात आलं होतं. मात्र, 8 वर्ष होऊन सुद्धा त्यांना नोकरीत सामावून घेतलं नाही. मागील 8 वर्षपासून उमेदवारांची दिशाभूल करून नोकरीपासून वंचित ठेवल्याचा आरोप करण्यात येतोय... काल नवीन कर्मचारी घेणार असल्याची जाहिरात आल्यानंतर 8 वर्षापासून नोकरी न देता पुन्हा एकदा परीक्षा का घेतली जाणार ? असा सवाल पात्र उमेदवारानी केला आहे.

LATEST VIDEOS

LiveTV