मुंबई : काँग्रेसकडून फेरीवाल्यांचा सन्मान, मृतांचा अपमान, सर्वसामान्य मुंबईकरांना काय वाटतं?

01 Nov 2017 12:09 PM

एलफिन्स्टन दुर्घटनेतील मृतांचा अपमान करण्याची एकही संधी काँग्रेस सोडत नसल्यानं लोकांनी संताप व्यक्त केलाय.
मालाडमध्ये फेरीवाला सन्मान मोर्चा काढल्यानंतर आज संजय निरुपम दादरमध्ये फेरीवाल्यांच्या समर्थनासाठी आंदोलन करत आहेत.
सकाळी 11 वाजता होणाऱ्या या आंदोलनात मुंबईभऱातील सगळ्या फेरीवाल्यांनी सहभागी व्हावं असं आवाहन निरुपम यांनी केलं.
दरम्यान काँग्रेसचा मोर्चा शिवसेना आणि मनसेचा गढ असलेल्या दादरमध्ये होत असल्यानं पोलिसांनी तुफान बंदोबस्त तैनात केला आहे.
तसंच पोलिसांनी मनसेच्या काही नेत्यांची धरपकडही सुरु केलीय. तर व्यापाऱ्यांनी अनुचित घटनेच्या भीतीनं आपली दुकानं बंद ठेवली आहेत.

LATEST VIDEOS

LiveTV