मुंबई : मनसेतून शिवसेनेत गेलेल्या नगरसेवकांच्या घरांना पोलिस संरक्षण

14 Oct 2017 02:06 PM

मनसे अध्यक्ष राज ठाकरेंना पत्ता लागू न देता थेट ‘मातोश्री’ गाठणाऱ्या मनसेच्या सहा नगरसेवकांच्या कुटुंबांना आता पोलीस संरक्षण देण्यात आलं आहे.

फोडाफोडीमुळे संतप्त झालेल्या मनसे कार्यकर्त्यांचा रोष पाहता कुठलीही अघटित घटना घडू नये, म्हणून दिलीप लांडे, दत्ताराम नरवणकर, परमेश्वर कदम, डॉ.अर्चना भालेराव, अश्विनी माटेकर आणि हर्षला मोरे यांच्या घरांना पोलीस संरक्षण देण्यात आलं आहे.

दरम्यान, अजूनही कोकण आयुक्तांसमोर नगरसेवकांच्या गटाची नोंदणी झाली नसल्यानं या सर्वांना अज्ञात स्थळी ठेवण्यात आलं आहे. हे सहाही नगरसेवक आपल्या घरी नसल्याचं समजतं आहे.

LiveTV