मुंबई : मुंबै बँकेच्या गैरव्यवहारप्रकरणी प्रवीण दरेकरांना दिलासा

13 Dec 2017 10:57 PM

मुंबई बँकेच्या गैरव्यवहाराप्रकरणी प्रवीण दरेकर यांना मोठा दिलासा मिळालाय... आज विधानसभेत मुंबई बँकेप्रकरणी प्रश्न उपस्थित करण्यात आला होता... त्यावेळी ही माहिती देण्यात आली... मुंबई बँकेच्या कर्ज गैरव्यवहारप्रकऱणी दक्षता पथकामार्फत करण्यात आलेल्या चौकशीत पदाधिकाऱ्यांच्या नातेवाईकांना क्लिनचिट मिळालीय... मुंबई बँकेतल्या कर्ज गैरव्यवहारप्रकरणी बँकेतील अधिकाऱ्यांवर अपहाराचं खापर फोडण्यात आलं होतं... मात्र, दक्षता पथकाच्या चौकशीत मुंबई बँकेच्या पदाधिकाऱ्यांच्या नातेवाईकांना क्लीन चिट देण्यात आलीय... मात्र चौकशीत तांत्रिक अनियमितता आढळल्यामुळे मुंबई बँकेच्या दोन शाखांच्या व्यवस्थापकांना निलंबित करण्य़ात आल्याचीही माहिती देण्यात आली... 

LATEST VIDEOS

LiveTV