मुंबई : मुख्यमंत्र्यांच्या मर्जीने विखेंच्या कारखान्याला कर्ज?

26 Oct 2017 06:39 PM

विरोधी पक्षनेते राधाकृष्ण पाटील यांना मुंबै बँकेनं 35 कोटींचं कर्ज मंजूर केलं आहे. विरोधकांना शांत करण्यासाठी ही साखरपेरणी सुरु असल्याचा गंभीर आरोप शिवसेनेचे नेते अभिजित अडसूळ यांनी केला आहे.

एकीकडे कर्जमाफी तांत्रिक अडचणीत अडकली असताना राधाकृष्ण विखे पाटील यांच्या पद्मश्री विठ्ठलराव विखे साखर कारखान्याला मुंबै बँकेनं 35 कोटीचं कर्ज मंजूर केलं आहे. विरोधकांना शांत करण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी मुंबै बँकेचे अध्यक्ष प्रवीण दरेकरांना ही कामगिरी सोपवल्याचा आरोप अडसूळ यांनी केला आहे.

LATEST VIDEOS

LiveTV