मुंबई : फेरीवाला मारहाण : राज ठाकरे आणि अमित ठाकरे मनसे विभाग अध्यक्ष माळवदेंच्या भेटीला

29 Oct 2017 12:12 PM

मनसे अध्यक्ष राज ठाकरे मालाडचे मनसे विभाग अध्यक्ष सुशांत माळवदेंच्या भेटीसाठी कांदिवलीतील ऑस्कर रुग्णालयात दाखल झाले आहेत. राज ठाकरेंसोबत त्यांचा मुलगा अमित ठाकरेही आहे. सुशांत माळवदे यांच्या प्रकृतीची विचारपूस राज ठाकरे यांनी केली.

मुंबईतील मालाडचे मनसे विभाग अध्यक्ष सुशांत माळवदे आणि काही कार्यकर्त्ये हे काल (28 ऑक्टोबर) दुपारी 3.30 वाजण्याच्या दरम्यान मालाड रेल्वे स्टेशन परिसरात फेरीवाले बसले आहेत की नाही, याची पाहणी करण्यासाठी गेले होते. त्याचवेळी अचानक फेरीवाल्यांच्या जमावाने सुशांत माळवदे आणि त्यांच्या सोबतच्या 4 ते 5 कार्यकर्त्यांवर जीवघेणा हल्ला चढवला.

फेरीवाल्यांच्या या जीवघेण्या हल्ल्यात माळवदे यांच्या डोक्यात लोखंडी रॉडनं हल्ला करण्यात आला. ज्यामुळे ते गंभीर जखमी झाले. त्यामुळे काही काळ या परिसरात तणावाचं वातावरण पसरलं होतं. सुशांत माळवदे यांची प्रकृती आणखी बिघडल्याने त्यांना कांदिवलीच्या ऑस्कर हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. तिथे त्यांच्यावर उपचार सुरु आहेत.

LiveTV