मुंबई : जानेवारीपासून राज ठाकरे राज्यव्यापी दौऱ्यावर, पक्षसंघटना बळकट करण्यासाठी प्रयत्न

10 Dec 2017 07:39 PM

नव्या वर्षात महाराष्ट्र नवनिर्माण सेना पुन्हा एकदा पक्ष संघटना मजबूत करण्याच्या कामाला लागणार आहे. जानेवारीपासून मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे राज्यव्यापी दौरा करणार आहेत. आज यासंदर्भात मुंबईतल्या कृष्णकुंज या राज ठाकरेंच्या निवासस्थानी पदाधिकाऱ्यांसोबत राज ठाकरेंनी चर्चा केली. यानंतर राज्यव्यापी दौऱ्याचा निर्णय घेण्यात आला.
सध्या मराठी भाषा आणि फेरीवाल्यांच्या मुद्द्यावरुन मुंबईत मनसे पक्ष पुन्हा सक्रीय होतोय. मात्र उर्वरित महाराष्ट्रातही कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य भरण्याचं काम या दौऱ्यातून होणार असल्याचं सांगण्यात आलंय.

LATEST VIDEOS

LiveTV