मुंबई : राज ठाकरेंचा व्यंगचित्रातून भाजपवर निशाणा

01 Nov 2017 01:03 PM

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी व्यंगचित्राच्या माध्यमातून पुन्हा एकदा भाजपवर निशाणा साधलाय राजकीय पक्षांमध्ये लोकशाही मूल्ये रुजवणं गरजेचं आहे, असं विधान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं होतं. याचा दाखला देत राज ठाकरेंनी भाजप आणि नरेंद्र मोदींना व्यंगचित्राच्या माध्यमातून फटकारलं.
मोदींच्या या विधानाच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरेंनी व्यंगचित्र रेखाटलं. मोदी हे पक्षातील नेते आणि कार्यकर्त्याला ‘माझं मत पटतंय का?’ असं दरडावून विचारताना दिसत आहेत. या व्यंगचित्रात नितीन गडकरी यांना भेदरलेल्या अवस्थेत दाखवण्यात आलं.

LATEST VIDEOS

LiveTV