मुंबई : नाताळच्या मुहूर्तावर पहिली एसी लोकल धावणार

25 Dec 2017 08:39 AM

मुंबईतील पश्चिम रेल्वेच्या प्रवाश्यांचा प्रवास आजपासून गारेगार होणार आहे. कारण पहिली एसी लोकल सकाळी 10.30 वाजता बोरीवली स्टेशनहून चर्चगेटला रवाना होणार आहे. एसी लोकलच्या दिवसाला 12 फेऱ्या असणार आहेत. तर शनिवारी-रविवार एसी लोकलला सुट्टी असणार आहे. भारतीय बनावटीच्या या एसी लोकलचे किमान तिकीट 60 रुपये असून कमाल भाडे 200 रुपये असेल असं बोललं जातं आहे. मात्र अद्याप दर अद्याप निश्चित झालेले नाहीत

LATEST VIDEOS

LiveTV