मुंबई : सलमानच्या पार्टीतला गोंगाट पोलिसांनी थांबवला, पार्टीला बड्या स्टार्सची हजेरी

14 Oct 2017 03:42 PM

मुंबईमध्ये काल रात्री बॉलिवूड स्टार सलमान खानच्या पार्टीतला वाढलेला आवाज कमी करण्यासाठी पोलिसांना दाखल व्हावं लागलं. सलमानची बहीण अर्पिता खाननं दिवाळी पार्टीचं आयोजन केलं होतं. यामध्ये सलमान, सोहेल आणि अरबाज या खान बंधूंसह कॅटरिना कैफ आणि शाहरुख खाननंही हजेरी लावली. मात्र रात्री उशीरापर्यंत या पार्टीत गाण्यांचा जोरदार आवाज सुरु होता. स्थानिकांच्या तक्रारीनंतर इथं पोलिस दाखल झाले आणि त्यानंतर पार्टीतला वाढलेला आवाज कमी झाला.

LATEST VIDEOS

LiveTV