मुंबई : वाहनांच्या व्हीआयपी नंबर विक्रीतून राज्याभरातील आरटीओंना 77 कोटीचं उत्पन्न

11 Dec 2017 11:06 AM

राज्यात दुचाकी आणि चारचाकी वाहनांचा बोलबाला दिसून येतो आहे. कारण राज्यभरात आरटीओला गेल्या ८ महिन्यात व्हीआयपी नंबर्सच्या मागणीतून 77 कोटींच उत्पन्न मिळालं आहे. व्हीआयपी नंबर्सच्या मागणीत राज्यात पुणे अग्रेरस असून, पुणे आरटीओनं 30 हजार 366 व्हीआयपी नंबर्सच्या विक्रीतून जवळपास 23 कोटींचं उत्पन्न मिळवलं. त्यापाठोपाठ नाशिक आरटीओनं 19 कोटी, ठाणे आरटीओनं 10 कोटी, कोल्हापूर आरटीओनं 7 कोटींचं उत्पन्न मिळवलं. मुंबईमध्ये अंधेरी, बोरीवली, वडाळा आणि ताडदेव आरटीओनं 6 हजार 652 वाहनांची विक्री केली असून, त्यातून जवळपास 6 कोटींची कमाई केली. चारचाकी वाहनासाठी 1 हा नंबर सर्वाधिक 12 लाख रुपयांना विकला गेला असल्याची माहिती आरटीओनं दिली. 

LATEST VIDEOS

LiveTV