मुंबई : संविधान दिनानिमित्त वरळीत संविधान दौडचं आयोजन, मुख्यमंत्र्यांची उपस्थिती

26 Nov 2017 12:57 PM


संविधानदिनानिमित्त एकात्मतेचा संदेश देण्यासाठी वरळी सी फेसवर संविधान दौड कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, हॉकीपटू धनराज पिल्ले, सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले आणि दिलीप कांबळे यांची उपस्थिती होती. यावेळी रामदास आठवलेंनी नागरिकांना आपल्या वेगळ्या शैलीत संविधानाचे महत्व पटवून दिले. या कार्यक्रमाची सुरूवात मुख्यमंत्र्यांनी संविधान प्रास्ताविकाचं वाचन करून केली. दौडमध्ये विद्यार्थी, एन सी सी कॅडेट, महिला, तृतीयपंथी, आणि नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. याचा समारोप दादरच्या चैत्यभूमीवर होणार आहे.

LATEST VIDEOS

LiveTV